तळेगाव, दि. 02 (पीसीबी) : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदवडी गावातून 17 लाख रुपयांचा माल भरलेला ट्रक चोरीला गेला. ही घटना रविवारी (दि. 1) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दीपक आत्माराम डेरे (वय 41, रा. निगडी प्राधिकरण) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डेरे यांचा 32 लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच 14/जेएल 8607) शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सुदवडी गावातील नक्षत्रम हॉटेल समोर पार्क केला होता. दरम्यान ट्रक मध्ये 17 लाख रुपये किमतीचा माल भरला होता. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.