श्री राजेश्वर काशिनाथ कलशेट्टी आणि सावित्री राजेश्वर कलशेट्टी यांनी काल दिनांक २९ एप्रिल रोजी योग हॉल कासारवाडी येथे मोफत जीवन बदलणारे सेमिनार आयोजित केले होते. भारतीय योग संस्था, नवचैतन्य हस्य क्लब आणि जेष्ठ नागरी संघ कासारवाडी यांच्या सदस्यांनी भरीव मदत केली.
हा सेमिनार के पी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन च्या अंतर्गत आयोजित करण्यात आला, केपी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हे नाव आई वडिलांच्या नावाच्या संदर्भात आहे. सेमिनारमध्ये, वक्त्यांनी उत्तम जीवन आणि उत्तम आरोग्य मिळवण्याच्या पद्धती डीकोड केल्या.
स्पीकर हे यूएसए मधील नेतृत्व, व्यवसाय आणि आरोग्यामध्ये प्रमाणित प्रशिक्षक आहेत. कलशेटटी यांनी सहज जिवनातील जगताना याणाऱ्या समस्या व त्यावर मात करण्याचे उपाय छोटा व मार्मिक गोष्टीच्या माघ्यमातुन नागरीकांच्य पटून दिल्या.साध्या व सोपे बदलातुन जिवनाचा सकारात्मक बदलाचा राजमार्ग त्यांनी सांगीतला.
वरील कार्यक्रमाच्या वेळेस प्रमुख उपस्थिती वक्ता श्री राजेश्वर काशिनाथ कलशेट्टी आणि त्यांचा पूर्ण परिवार, मा.आशाताई शेंडगे( मा.नगरसेविका) श्री अंकुश भामे, श्री विजय मानकर, श्री सुहास बोरावके, श्री प्रशांत तनपुरे आणि श्री देवकर सर आदी उपस्थित होते. तसेच कासरवाडी पिंपरी चिंचवड मधील, पुणे, मुंबई येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.