पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. शहरात नामांकित कंपन्यांसह सुमारे साडेतीन हजार लघुउद्योग आहेत. या कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत विशेषत: कोरोना कालावधीत महापालिकेला आपल्या सीएसआर फंडातून व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई कीट, फेस शिल्ड, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, हॅन्ड गोल्व्हस यासह आदी भरघोस मदत केली आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेला मोठी मदत झाली.
कोरोना कालावधीत शहर परिसरातील विविध कंपन्यांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला कंपन्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये कंपन्यांनी 3 लाख 94 हजार 300 मास्क, 44 हजार 713 पीपीइ कीट, 10 हजार फेस शिल्ड, कोविड केअर सेंटरसाठी 2 हजार बेड्स आणि इतर साहित्य 12 हजार 148 मेडीकल हॅन्ड गोल्व्हज्, 156 व्हेंटीलेटर्स, 55 सिरीज पंप, 58 नेब्युलायझर, 45 व्हील चेअर्स दिल्या होत्या. आयसीयु बेड, हाय फ्लो ओ टू मशीन, टू डिफिब्रिलेटर्स इ. वैद्यकीय साधनांचा समावेश आहे.
कंपन्यांना सीएसआर फंडातून 2 टक्के निधी खर्च करावा लागतो. शहर आणि परिसरात अनेक नामांकित कंपन्या आहेत. या कंपन्यांशी महापालिकेने कोरोना कालावधीत संपर्क साधून मदतीसाठी आवाहन केले होते. या आहवानाला कंपन्यांनी भरघोष प्रतिसाद देऊन मोलाची मदत केली आहे.
अॅमक्युअर फार्मासिटिकल्स, टाटा ऑटो कॉम्प, टेट्रा पॅक, सिप्ला फाउंडेशन, टाटा मोटर्स, ऑक्सिस बँक, फोब्स मार्शल, सिस्को इंडिया अँड एसए, एआरसी, वेस्ट झोन इंडिया (उबेर), सॅडविक वॉटर इंडिया टूल प्रायव्हेट लिमिटेड, अल्फा लावल लिमिटेड, मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स, फिनोलेक्स, दिवी तुर्क ट्रान्सफर, थरमॅक्स फाउंडेशन, जानकीदेवी बजाज, सेंचुरीका लिमिटेड, एम्फेनॉल, ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंटॉन इंडिया फाउंडेशन, कॅपजेमिनी टेक्निकल सर्व्हिसेस, अॅटलास कॉपको, गरवारे | टेक्निकल लिमिटेड, इंटरनॅशनल अससोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूज, एचडीएफसीबैंक, अॅमेझॉन इंडिया, एसकेएफ इंडिया लिमिटेड, इन्फोसिस हिंजवडी, क्रेडाई, पुणे मेट्रो, वॉक्सवेगन, बँक ऑफ महाराष्ट्र कॉग्निझेंट, पर्सिस्टंट लिमिटेड, युनायटेड वे मुंबई, | हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांमार्फत वस्तू स्वरुपात मदत प्राप्त झाली.