सीएमई परिसरातून चंदनाचे झाड चोरीला

0
143

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) भोसरी,

दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (सीएमई) परिसरातून चंदनाचे झाड चोरीला गेले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली.

अशोक संभाजी साठे (वय 45, रा. बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश विश्वनाथ मधे (वय 20, रा. अहमदनगर), राजू डोके, सुश्या (पूर्ण नाव माहिती नाही), सचिन रामदास गिरे (तिघे रा. ओतूर पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अवैधपणे सीएमई परिसरात प्रवेश केला. परिसरातील चंदनाचे झाड कापून ते चोरी करून घेऊन जात असताना चौघेही आढळून आले. त्यांच्याकडूनच चंदनाच्या झाडाचे तुकडे, लोखंडी कुऱ्हाड, करवत, वायर कटर आणि दुचाकी असा एकूण 58 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.