सीएनजी पंपावर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यास अटक

0
345

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – पुनावळे येथील सीएनजी पंपावर महिलेला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या इसमाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) घडली.

पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रम लालजी दिक्षीत (वय 38 रा.आंबेगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी पंपावर पीडित महिला या त्यांच्या कारमध्ये सीएनजी गॅस भरत होत्या. यावेळी आरोपी त्याची गाडी घेऊन मागून आला व त्याने पीडितेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पीडितेचा हात ओढून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.