सीआयडीची मोठी कारवाई, “या” कंपनीची १००० कोटींची मालमत्ता जप्त !

0
285

देश,दि.२१(पीसीबी) – मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेड (एमसीएफपीएल) संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची आंध्र प्रदेश सीआयडीकडून चौकशी केली जात आहे. सीआयडीने या प्रकरणात एकूण सात एफआरआय दाखल केले आहेत. एमसीएफपीएल ही संस्था ईनाडू समूहाच्या मालकीची आहे. या समूहाचे संचालक सी रामोजी राव आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी हे ईनाडू समूहावर नेहमीच आरोप करतात. या समूहाकडून नेहमीच तेलुगू देसम पार्टी आणि या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची बाजू घेतली जाते, असा आरोप जगनमोहन रेड्डी करतात. असे असतानाच सीआयडीने ईनाडू समूहाचे संचालक असलेल्या सी रामोजी राव यांच्यावर वरील कारवाई केली आहे. या कारवाईत आंध्र प्रदेश सरकारने मार्गदर्शी चिट फंड कंपनीची एकूण १ हजा ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सीआयडीने दिलेल्या माहितीप्रमाणे मार्गदर्शी ग्रुपची एकूण उलाढाल ९ हजार ६७७ कोटी रुपये आहे.

मार्गदर्शी ग्रुपने चिट फंड कायद्याचे उल्लंघन केल्याचाही दावा सीआयडीने केला आहे. “मार्गदर्शी ग्रुपने त्यांच्या सभासदांनी गुंतवलेले पैसे एचयूएफ (हिंदू अनडिव्हाईडेड फॅमिली) मध्ये वळवले आहेत. यासह कायद्याचे उल्लंघन करून हे पैसा म्यूच्यूअल फंडसारख्या जोखीम असलेल्या बाजारताही गुंतवण्यात आले आहेत. वार्षिक ४ ते ५ टक्के दराने व्याज देण्याचे आमिष दाखवून मार्गदर्शी समूहाकडून लोकांकडून जबरदस्तीने ठेवी मिळवलेल्या आहेत,” असे सीआयडीचे एडीजीपी यांनी सांगितले.

“मार्गदर्शी ग्रुपने चिट फंड कायदा १९८२ नुसार त्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची कागदपत्रे सादर केलेले नाहीत. या समूहाने आपल्या खाते आणि नोंदवह्यांमध्ये गडबड केली आहे. तपास संस्थांना सहकार्य करण्याऐवजी संबंधित संस्था सीआयडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोपही सीआयडीचे एडीजीपी यांनी केला. सीआयडीने केलेल्या कारवाईबाबत ईनाडू समूहाला विचारण्यात आले. मात्र या समूहाची कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या टीमने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे आम्ही यावर बोलणार नाही, असे सांगितले.