सिलेंडर बाळगल्याने हातगाडी चालकावर गुन्हा

0
284

खाद्य पदार्थांची गाडी चालवणाऱ्यांनी खाद्य पदार्थ बनवण्यासाठी सिलेंडर, गॅस शेगडी असे ज्वालाग्राही साहित्य बाळगले म्हणून पिंपरी पोलिसांनी हातगाडी चालक आणि मालकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) दुपारी बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे केली.

विष्णूपोलाप्पा सोनेपोगुल (वय 31, रा. गांधीनगर, पिंपरी), प्रवीण रामभाऊ कांबळे (वय 44, रा. गांधीनगर, पिंपरी), महेश कुमार पुलपांडे (वय 24, रा. गांधीनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भुरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नेहरूनगर रस्त्यावर आरोपींनी खाद्य पदार्थांची गाडी लावली. त्यावर गॅस सिलेंडर, शेगडी मांडून त्यावर मसाला डोसा, उत्तप्पा असे खाद्य पदार्थ विकले. हातगाडी रस्त्याच्या मध्ये लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच सिलेंडरमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.