सिमेंटच्या जंगलात टेरेसवर फुलवली सफरचंदाची बाग.

0
181

वाकड, 8 ऑगस्ट (पीसीबी) – आदर्श कॉलनी वाकड येथे डॉ. धुमाळ नंदकिशोर यांनी फुलवली सफरचंदाची बाग,पर्यावरण प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण,राज्यात एकमेव सफरचंदाची टेरेस गार्डन निर्माण करण्यात ते  यशस्वी. घरी खाण्यासाठी आणलेल्या सफरचंदामधील बीया सहज प्रयोग म्हणून घरा समोरील अंगणात रूजवल्या. त्याची योग्य निगा राखत संगोपन करत रोप वाढविले. काही महिन्यातच त्याला फुले येऊन फळे येऊ लागली. केलेल्या प्रयोगाला यश मिळाले. जम्मू काश्मिर सारख्या थंड हवेच्या प्रदेशात येणारे सफरचंदाचे झाड, महाराष्ट्रातील उष्ण व दमट हवामानामध्ये यशस्वी फुलले हे राज्यासाठी कुतूहलाचा विषय झाला. आलेले सफरचंद खाण्यास योग्य असल्याचा निर्वाळा सरकारी प्रयोगशाळेने दिला. विशेष म्हणजे, थंड हवेत येणारे सफरचंदाचे झाड घराच्या परसबागेत फुलविल्याची दखल घेत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करून गौरविण्यात आले. सन २०१२, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हरियाणा मधील युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली गेली. सन २०१९ मध्ये युनिव्हमिल तामिळ विद्यापीठ कडून डॉक्टरेट पदवी देवून गौरविण्यात आले. मात्र, राज्य शासनाकडून कृषी क्षेत्राशी निगडीत दरवर्षी दिले जाणाऱ्या शासनाच्या मानाच्या पुरस्कारासाठी या प्रयोगाची दखल घेतली .

ते एवढयावर थांबले नाहीत तर सफरचंदाच्या झाडाला लागणारे कंपोस्ट खतासाठीचे मशीन विकत घेऊन त्याचे उदघाटन गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.त्या मशिनमध्ये लाकडाचा भुसा व कल्चर पावडरचे दोन चमचे पावडर आणि ओला कचरा त्यामध्ये टाकला जातो त्या मशीनला दोन कप्पे असतात. एका महिन्यामध्ये एक पार्ट पूर्ण भरला जातो दुसऱ्या महिन्यात दुसरा पार्ट भरला जातो त्याचे कंपोस्ट खत म्हणून टेरेसवरील सफरचंदाच्या झाडांना व इतर झाडांना हि दिले जाते अशा प्रकारे घरच्या घरीच त्यांनी सफरचंदाच्या बागेसाठी तयार केलेले कंपोस्ट खत दिले जाते. कामगार कल्याण मंडळाचे कोअर कमिटीचे पदाधिकार आणि गुणवंत कामगार व  उपस्थितांना  डॉ नंदकिशोर धुमाळ यांनी माहिती दिली .

यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण म्हणाल्या की एक प्रकारचे धुमाळ यांनी देशसेवेलाच हातभार लावला आहे असे जागृत नागरिक प्रत्येक शहरांमध्ये आणि उपनगरामध्ये असणे गरजेचे आहे असे कौतुकास्पद गौउदगार चव्हाण यांनी काढले. घरच्या घरी कंपोस्ट खत तयार होणारे मशीन  नागरिकांनी घेऊन निर्माण होणारे खत आपल्या टेरेस वापरण्याचे त्यांनी आवाहन केले आणि त्यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी डॉ. भारती चव्हाण यांच्या बरोबरच कोअर कमिटीचा ही सन्मान धुमाळ कुटुंबीयांच्या वतीने वृक्ष देऊन करण्यात आला.

घरचा ओला कचरा घरच्या घरी जिरवा या कार्यक्रमाला डाॅ.भारतीताई चव्हाण ,सौ.अनिता धुमाळ , डाॅ.अंकुश बोडके अध्यक्ष एस पी स्कुल , कामगार कल्याण मंडळाचे कोर कमिटी सदस्य राजेश हजारे, आण्णा जोगदंड,शहराध्यक्ष महमंदशरीफ मुलाणी,सौ संगिता जोगदंड,भरत शिंदे, तान्हाजी एकोंडे,भरत बारी,महेंद्र गायकवाड भगवानराव पाटील ,अशोक सरतापे, सोमनाथ पतंगे  थेरगाव जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णूपंत तांदळे उपस्थीत होते सुत्र संचालन श्री.भरत बारी यांनी केले तर प्रस्ताविक श्री.बाळासाहेब सांळुके व समारोप श्री.महेंद्र गायकवाड यानी केले.