सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक

0
201

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेऊन त्याआधारे तीन मोबाईल फोन खरेदी करत एक लाख 23 हजारांची फसवणूक केली. ही घटना 19 मार्च ते 24 जुलै या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

विकास भास्कर चौतमाल (वय 30, रा. साखरे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. संभाजीनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विष्णू पाडाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांचा सिबिल स्कोर चेक करायचा होता. त्यासाठी त्यांनी आरोपीशी संपर्क केला. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कागदपत्रे घेत त्या आधारे एक मोबाईल फोन खरेदी केला. खरेदी केलेला मोबाईल रद्द करतो असे सांगून आणखी दोन मोबाईल फोन खरेदी केले. यामध्ये फिर्यादी यांची एक लाख 23 हजार 988 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.