सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात शार्प शूटर संतोष जाधवला अटक

0
742

पुणे, दि. १३ (पीसीबी) – गायक सिद्धू मुसेवाला याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका शार्पशूटरला अटक केली आहे. गुजरातमधून या शार्पशूटरला अटक करण्यात आली असून रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं.

पुढच्या तपासासाठी न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गेल्या आठवड्यात सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची नावं पंजाब पोलिसांनी जाहीर केली होती. त्यापैकी महाकाल याला संगमनेर जवळून अटक केली होती. त्यासाठी पंजाब पोलिसांचं पथक पुण्यात आलं होतं. तर आता संतोष जाधवला पुणे पोलिसांच्या पथकाने गुजरातमधून अटक केली आहे.