सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना भरधाव कारची धडक

0
59

चिंचवड, दि. 02 (पीसीबी) : सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास महावीर चौक चिंचवड येथे घडली.

सतीश धनाजी जाधव (वय 50), नलिनी सतीश जाधव (वय 47, दोघे रा. कासारवाडी, पुणे), नीता गिरीश फरांदे (वय 46), ऋतुजा ज्ञानेश्वर पवार (वय 27, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी बीधान सुधीरकुमार साहू (वय 43, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बीधान साहू हे पुणे मुंबई महामार्गाने जात असताना महावीर चौक चिंचवड येथे सिग्नल वर थांबले. त्यांच्या पाठीमागून आलेल्या कारने (एमएच 14/एलआर 2016) साहू यांच्या कारला तसेच एका दुचाकीला धडक दिली. साहू यांच्या कारला अचानक धडक बसल्यामुळे त्यांची कार पुढील दुचाकीवर आदळली. या अपघातात दोन्ही दुचाकी वरील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.