पिंपरी, दि. 12 (पीसीबी) : सिगारेट घेण्याच्या वादातून दोघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १०) सकाळी आठ वाजताच्या सुमारास लालटोपी नगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद जगतसिंग रावत (वय २५), जगतसिंग खेमसिंग रावत (वय ५६, दोघे रा. लालटोपी नगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांचा सिगारेट घेण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मित्राला देखील मारहाण केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.