सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार

0
686

पुणे, दि. ३१ (पीसीबी) : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.30) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देशी बनावटीच्या पिस्तूला मधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपींनी दोन राऊंड फायर केले आहे. सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

आरोपींनी कोणत्या कारणामुळे गोळीबार केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस संशयित आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.