सिंधी समाजाच्या ‘चालिहो’ उत्सवाला प्रारंभ

0
437

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाला पिंपरी-चिंचवडमध्ये आज (शनिवार) पासून उत्साही वातावरणात दिवे लावून प्रारंभ झाला.

सिंधी समाजाचे आराध्य दैवत बाबा झुलेलाल यांनी सुमारे एक हजार 66 वर्षांपूर्वी विश्वशांती, बंधुभाव यांचा संदेश दिला. सर्वांनी एकोप्याने राहावे, एकमेकांमधील सलोखा वाढावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची शिकवण बाबा झुलेलाल यांनी दिली होती. त्याची आठवण ठेवत ‘चालिहो साहेब उत्सव’ सिंधी बांधव दरवर्षी उत्साहात साजरा करतात. या कालावधीत उपवास केले जातात. मांसाहार वर्ज्य केला जातो. मद्यप्राशन केले जात नाही.

उत्सवानिमित्त सायंकाळी सात वाजता बाबा झुलेलाल मंदिरात ज्योत प्रज्वलित करण्यात आली. मंदिरात पुढील 40 दिवसांसाठी ज्योत प्रज्वलित करून ठेवली जाते. सिंधी बांधवांनी या ज्योतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पिंपरीच्या झुलेलाल घाटावर नदीची पूजा आणि अर्घ्य दिले गेले. मंदिरात कालावधीत मंदिरात भजन, किर्तन, पालव आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.