सिंधी प्रीमिअर लीग’चे पाचवे पर्व ८ फेब्रुवारीपासून

0
296

-सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजन; पाचव्या हंगामात १६ पुरुष, ६ महिला संघ खेळणार

पिंपरी, दि. १५ (पीसीबी): सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे पाचवे पर्व यंदा ८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या कालावधीत पिंपरी येथे होणार आहे. यंदा महिलांच्या क्रिकेट सामान्यांचेही आयोजन केले असून, १६ पुरुष संघ व ६ महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

थेरगाव येथील हॉटेल नूर्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उद्योजक सुनील अडवाणी, अनिल आसवानी, जितू पहलानी यांच्यासह संयोजन समितीतील कमल जेठानी, रोनक पंजाबी, अवि इसरानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, रितेश आठवानी, महिला प्रतिनिधी अवनी तेजवानी, खुशबू पंजाबी, हिना गोगिया, शिखा सेवानी, शीतल पहलानी, रुपाली पंजाबी संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.

हितेश दादलानी म्हणाले, “देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने हिरे स्पर्धा आयोजित केली जाते. सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन ५’चे उद्घाटन ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो”

कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या चार हंगामात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास १५ लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड, बंगळुरू येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. यंदा महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, महिलांचे सहा संघ स्पर्धा खेळणार आहेत. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे ६ संघमालक आपल्या २२ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”

या स्पर्धेतील पुरुष गटाच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी, तर महिला संघांचे नाव नद्यांशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (डब्बू आसवानी फाउंडेशन, हिरानंद आसवानी), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम डेव्हलपर्स, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (झमतानी ग्रुप, अनूप झमतानी), एसएसडी फाल्कन (विक्रम रोहिडा फोटोग्राफी, विक्रम रोहिडा), इंडस डायनामॉस (शगुन टेक्सटाईल, सुमित बोदानी), दादा वासवानीज ब्रिगेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, अनिल आसवानी), झुलेलाल सुपरकिंग्ज (जेठानी ग्रुप, पियुष जेठानी), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (ट्रिओ ग्रुप, बिपिन डाखनेजा), गुरुनानक नाइट्स (पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड, प्रकाश रामनानी), संत कंवरम रॉयल्स (विजयराज असोसिएट्स, क्रिश लाडकानी), आर्यन्स युनायटेड (रोहित इन्फ्रा, राजीव मोटवानी), जय बाबा स्ट्रायकर्स (सुखवानी असोसिएट्स, सागर सुखवानी), सिंधी इंडियन्स (मनसुखवानी असोसिएट्स, मनीष मनसुखवानी), अजराक सुपरजायंट्स (लाइफक्राफ्ट रियल्टी, हितेश दादलानी) व पिंपरी योद्धाज (सोहम मोबाईल, कुणाल लखानी) अशी या संघांची नावे आहेत.

महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स (तेजवानी हँडलूम्स अँड फर्निशिंग्स, अन्वी व अविनाश तेजवानी), कावेरी क्रुसेडर्स (रामा ग्रुप, खुशबू व विनेश पंजाबी), गोदावरी जायंट्स (द कॉर्नर लाउंज, हिना व सनी गोगिया), झेलम क्वीन्स (सिटी कार्स, शिखा व रॉकी सेवानी), सिंधू स्टारलेट्स (जीएस असोसिएट्स, शीतल व जितू पहलानी) आणि यमुना स्ट्रायकर्स (एसएसजीएन, रुपाली व प्रवीण पंजाबी) यांचा समावेश आहे. महिलांमध्ये ७२, तर पुरुषांमध्ये २६१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नूर्या होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स (अनिल आसवानी), सिंग स्टील अँड अल्युमिनियम (मनजीत सिंग वालेचा), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), जय मोबाईल (गोपी आसवानी), रवी बजाज व रोहित तेजवानी, ग्रोफिन (अभिजित बोनगीरवार), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), विशाल प्रॉपर्टीज (विशाल तेजवानी), बालाजी होम्स (आशुतोष चंदीरामानी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), आकार कृष्णानी ग्रुप (राहुल कृष्णानी), सोलार्ज एनर्जी (विनीत व कौशिक धर्मानी), स्टीरलियन (राजकुमार जवारानी, देवेश चंचलानी), विक्रम रोहिडा फोटोग्राफी, सीजे हब (चिनू जैन) यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.