दि.१२(पीसीबी) – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील तालुक्यातील उर्से टोलनाका येथे सोमवारी दुपारच्या सुमारास नागरिकांनी ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण केल्याची घटना घडली. वॉर्डनने बस चालकाकडून पैसे उकळ्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी संबंधीत वॉर्डनची चौकशी केली असता ‘साहेबांनी पैसे घ्यायला सांगितले आहे’, अशी कबुली दिली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे वसूल करत असल्याचा त्याच्यावर आरोप असून, मारहाणीचा आणि कबुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली. तेंव्हा कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच नाव घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर संबंधित वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटलांनी दिली.