सुनिल गव्हाणे, काशिनाथ नखाते, इम्रान शेख, काशिनाथ जगताप यांचा समावेळ
मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले. शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख हे सुरवातीला अजितदादांच्या मागे गेले आणि दोन दिवसांत आपली भूमिका बदलून मी शरद पवार यांच्या बरोबर असे त्यांनी जाहीर केले. बहुसंख्य माजी नगरसेवक अजितदादांच्या बरोबर आहेत. शरद पवार यांच्या समर्थकांत प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, प्रदेश विद्यार्थी संघटनेचे सुनिल गव्हाणे यांनी राहणे पसंत केले. आता याच मंडळींच्या हातात शहर राष्ट्रवादीची सूत्र सोपविण्यात आली आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज स्वतंत्र पत्राक काढले आणि पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीतीन नऊ सदस्यांची नावे जाहीर केली. सुनिल गव्हाणे यांच्यासह इम्रान शेख, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, राजन नायर, शिलाताई भोंडवे यांचा या कार्यकरणीत समावेश आहे. आगामी काळात कार्यकारणी सदस्यांची ही समितीच शरद पवार यांच्या विचारानुसार पक्षाचे कामकाज चालवतील असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.