साहित्‍याचे पैसे मागितल्‍याने दुकानदारास मारहाण

0
6
crime

बावधन, दि. ९

तेलाच्‍या डब्‍याचे पैसे मागितल्‍याच्‍या कारणावरून दोन जणांनी दुकानदाराला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री तापकीर वस्‍ती, सुसगाव येथे घडली.

सागर तांदळे (रा. विद्याव्‍हॅली रोड, पारखे वस्‍ती, सूसगाव, पुणे) आणि अनिकेत (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. हनुमान नाराणराम चौधरी (वय २९, रा. सदगुरू अपार्टमेंट, शिवबा चौक, सूसगाव) यांनी बुधवारी (दि. ८) याबाबत बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास दोन्‍ही आरोपी फिर्यादी चौधी यांच्‍या दुकानात आले व त्‍यांनी तेलाचा डबा मागितला. त्‍या तेलाच्‍या डब्‍याचे पैसे फिर्यादी चौधरी यांनी मागितले. याचा राग आल्‍याने आरोपींनी आपसांत संगनमत करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले साहित्‍य विस्‍कटून टाकले. फिर्यादी यांची पत्‍नी आरोपींना अडविण्‍यासाठी आली असता आरोपींनी त्‍यांना शिवीगाळ करीत लोखंडी भाव फलक पाटी फेकून मारली. तसेच फिर्यादी यांच्‍या दुकानातील कामगार चैनाराम चौधरी, रुपाराम चौधरी हे सोडविण्‍यासाठी आले. तसेच आरोपींचा आवाज ऐकूण शेजारील दुकानदार आले असता आरोपींनी तेथून काढता पाय घेत पळून गेले. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.