दि. 1 ऑगस्ट (पीसीबी)पिंपरी – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आणि दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्यील प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप,सामाजिक कार्यकर्ते मयुर जाधव, भीमराव बरकडे,मयूर गायकवाड, मुख्य लिपीक वासिम कुरेशी यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
निगडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच दिवंगत महापौर मधुकरराव पवळे आणि भक्ती शक्ती चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास देखील अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, विजय वायकर,निलेश देशमुख, माजी नगरसदस्य सचिन चिखले,शशिकिरण गवळी, भगवान शिंदे, मारुती भापकर,विनायक रणसुंभे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मयूर जाधव,नाना कसबे, सतिश भवाळ,संदीप जाधव, मयूर गायकवाड, भीमराव बरकडे,संजय ससाणे,अरूण जोगदंड, शिवाजी साळवे, डी.पी. खंडाळे, नाना कांबळे, आबा मांडरे, रामदास कांबळे, रामेश्वर बावणे, सविता आव्हाड, उप अभियंता अभय कुलकर्णी,मीनल डोडल, कनिष्ठ अभियंता अमित बावनकर, पल्लवी सासे, सारिका नागरगोजे आदी उपस्थित होते.
आज निगडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पाच दिवसाचे प्रबोधन पर्व आयोजित करण्यात आले आहे…
उद्या शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी सनई वादनाने प्रबोधन परवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता शाहिरी गरजली अण्णांची हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संजय मगर, शाम चंदनशिव हे सादर करतील. सकाळी १०.३० वाजता स्वरगंधर्व प्रोडक्शन प्रस्तुत समाज प्रबोधनपर कार्यक्रम पांडुरंग गायकवाड सादर करतील. दुपारी १२ वाजता म्युझिक ऑफ बॉलीवूड हा कार्यक्रम अमीर शेख हे सादर करणार आहे, दुपारी १.३० वाजता लेखणीचा बादशाह बापू पवार शाहिरी कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रसार व प्रचार या विषयावर डॉ. संभाजी बिरजे, रमेश पांडव, बालाजी कांबळे, सुभाष खिलारे, सोमनाथ कद, आचार्य रतनलाल सोनाग्रा हे संवाद साधतील. सायंकाळी ५ वाजता सुरप्रित अशोक हे गझल गायनाने साहित्यरत्नास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता आईसाहेब प्रोडक्शन प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल.
शनिवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम मिठू पवार हे सादर करतील. त्यानंतर सकाळी १० वाजता पठ्ठा लहुजींचा या प्रबोधनात्मक गीतांचा जंगी कार्यक्रम लखन अडागळे सादर करतील. सकाळी १२ वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम “मी होणार सुपरस्टार फेम” ज्ञानेश्वरी कांबळे आणि निलेश देवकुळे हे सादर करतील. दुपारी ३. वाजता परिसंवाद ठेवण्यात आला आहे. परिसंवादाचा विषय समाजातील युवक व युवतींची राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती हा असून यामध्ये सचिन अडागळे , भूषण ओझर्ड , संतोष कसबे , डॉ. साबळे पांडूरंग , प्रा. प्रदीप कदम यांचा सहभाग असेल. सायंकाळी ५ वाजता “स्नेह शितल इव्हेंटस” हा कार्यक्रम शितल चव्हाण सादर करतील. रात्री ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून नाटक राजपाल वंजारी हे सादर करतील. त्यानंतर रात्री ८ वाजता ऑर्केस्टा वर्ल्ड म्युझिक या कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाच्या तिस-या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होईल.
रविवार, ४ ऑगस्ट या प्रबोधनपर्वाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात सकाळी ९ वाजता वाद्यावुंदासह गीत गायनाच्या कार्यक्रमाने होईल. हा कार्यक्रम अमर पुणेकर हे सादर करतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सांगीतिक अविष्कार क्रांतीचा एल्गार हा कार्यक्रम बालशाहीर विकास येडके हे सादर करतील. सकाळी ११.३० वाजता स्वर्ण लहरी या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम अनिकेत जवळेकर हे सादर करतील. त्यानंतर दुपारी १.०० वाजता के.डी. कड प्रस्तुत ऑल इन वन मनोरंजनाचा खेळ रंगला हा महिलांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाला अ,ब,क,ड च्या आरक्षणाची गरज व वर्गीकरणाची आवश्यकता (अटी) असा परिसंवादाचा विषय असून अविनाश बागवे, भगवानराव वैराट , खंडदेव कटारे, अंबादास सगर, उल्हासदादा पवार यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५ वाजता अण्णा भाऊंची गीते हा कार्यक्रम राहुल शिंदे हे सादर करतील. सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सूर पल्लवी इव्हेंट्स आयोजित गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता जयेदू मातोश्री प्रॉडक्शन प्रस्तुत थोरवी अण्णाची या लोक गीतांच्या कार्यक्रमाने चौथ्या दिवसाची सांगता होईल.
सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आनंद सृष्टी हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नंदकुमार नेटके आणि अभिजीत राजे सादर करतील. सकाळी १०.३० वाजता गीते अण्णा भाऊंची हा कार्यक्रम महेंद्र बनसोडे आणि सहकारी सादर करतील. सकाळी ११.३० वाजता असा आमचा साहित्य सम्राट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण चित्रसेन भवार करणार आहे. दुपारी १ वाजता स्वरगंध प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता “आठवण अण्णांची गीतगायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बाळासाहेब निकाळजे सादर करतील. दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास हा या परिसंवादाचा विषय असेल. यामध्ये जालिंदर कांबळे , दादा महाराज पाटोळे , वर्षा डहाळे, संदीपान झोंबाडे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्वाती महाडिक आणि सहकारी सादर करतील. सायंकाळी ५.३० वाजता आपले अण्णा भाऊ हा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यामध्ये आपले अण्णाभाऊ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते व मुलाखतकार राहुल सोलापुरकर व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी ७.०० वाजता एस.के. प्रॉडक्शन प्रस्तुत साहित्याचा कोहिनूर हिरा – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याविषयावर प्रबोधनात्मक गीते,लोककला,लोकगीते,मुजरे हा विविध पंचरत्न कार्यक्रम एस.के. प्रोडक्शन द्वारे सादर करण्यात येणार आहे