सासूने सोन्याची चेन दिली नाही म्हणून पत्नीचा आवळला गळा; पतीला अटक

0
388

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – सासूने लग्नात सोन्याची चेन दिली नाही. या कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना 4 जून रोजी रात्री बावधन येथे घडली.

नकुल कोमलदास आठवले (वय 33, रा. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने दारूच्या नशेत फिर्यादी यांच्या आईने लग्नात सोन्याची चेन दिली नाही, याचा राग मनात धरून वारंवार फिर्यादीला हाताने मारहाण केली. 4 जून रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी त्यांच्या बेडरूम मध्ये असताना आरोपी पतीने त्यांचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.