सासुरवाडीत जावयाचा राडा; पत्नीसह सासू-सासर्‍यांनाही मारहाण

0
103

चिखली, दि. 22 (पीसीबी) –

पत्नीने फोन घेतला नाही या कारणावरून जावयाने सासुरवाडीत राडा. केला जावयाने पत्नीसह सासू-सासर्‍यांनाही बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे घडली.

अमोल अरुण गायकवाड (वय 30, रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र विठ्ठल सोनवणे (वय 55, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे, त्यांची पत्नी आणि मुलगी असे घरी असताना जावई अमोल गायकवाड हा घरी आला. माझा फोन का घेतला नाही असे म्हणत त्याने पत्नी पूजा गायकवाड हिला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी मध्ये गेली. त्यावेळी आरोपीने त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी सोनवणे भांडण सोडविण्यासाठी गेले असता जावयाने त्यांनाही बेदम मारहाण केली. यामध्ये सोनवणे यांच्या कानाला जखम झाली. तसेच एक दात पडला. जावई अमोल याने फिर्यादी यांची मुलगी पूजा हिच्या डोक्यात मोबाईल फोन मारून तिला जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.