सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएमची चोरी

0
187

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत.

याबाबत साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले.

या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.