सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..

0
437

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – आर्थिक कारणांवरून होणा-या त्रासाला कंटाळून विवाहितेने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडली.कोंडीबा मच्छिन्द्र थोरे (वय 50, रा. कमालपूर, ता. औसा, जि. लातूर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रकाश दादाराव गायकवाड, सासरे दादाराव गायकवाड, दीर गणेश दादाराव गायकवाड आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 25 वर्षीय मुलीला आरोपींनी लग्नात ठरल्या प्रमाणे घर बांधकामासाठी एक लाख रुपये वडिलांकडून आणले नाहीत, या कारणावरून सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने सासरच्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.