सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
622

चिंचवड, दि. ०३ (पीसीबी) – सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) इंदिरानगर चिंचवड येथे घडली.

राजेंद्र कृष्णा मोरे (वय 60, रा. सातारा) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतन कांबळे, आकाराम कांबळे आणि तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 27 वर्षीय मुलीचा केतन कांबळे याच्यासोबत मागील दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सासरच्या लोकांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. तिचा कौटुंबिक छळ केला. त्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.