सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
513

वडमुखवाडी, दि. ०९ (पीसीबी) – वडिलांच्या संपत्तीत तुझा हिस्सा माग म्हणत विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. सासर व माहेर यांच्या मध्ये अडकलेल्या पिडीतेने अखेर गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना बुधवारी (दि.6) वडमुखवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. त्यावरून पती प्रसाद बाळासाहेब वीर (वय 29 रा.वडमुखवाडी), दोन महिला आरोपी, सासरे बाळासाहेब नानासाहेब वीर ( रा.आष्टी बीड) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा 24 फेब्रुवारी 2022 साली आरोपीशी विवाह झाला. मात्र माहील पाच ते सहा महिन्यांपासून आरोपी हे पिडीतेला तू मुलगी आहेस तुझा वडिलांच्या संपत्तीवर हक्क आहे. तू जमिनीतील वाटा माग म्हणत वेळोवेळी भांडणे केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून पिडीतेचा शारीरिक व मानसिक छळ केला. यातून पोलिसात तक्रार केली तर धमकी दिली. पती व सारच्या जाचाला कंटाळून पीडितेने अखेर राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.