सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
607

चाकण, दि. १३ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून 34 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाकी खुर्द सुंबरेनगर चाकण येथे शनिवारी (दि. 11) दुपारी घडली.

याप्रकरणी मयत विवाहितेच्या 70 वर्षीय आईने रविवारी (दि. 12) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रमोद सुखदेवराव भिसे, सासरा सुखदेवराव हरिभाऊ भिसे, दिर, संतोष सुखदेवराव भिसे, महादेव सुखदेवराव भिसे, दोन जावा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मयत मुलगी 30 मार्च 2007 ते 11 जून 2022 या कालावधीत सासरी नांदत असताना आरोपींनी ती आवडत नसल्याच्या कारणावरून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने शनिवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी बेडरूम मध्ये फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास सासरच्या लोकांनी प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.