सासरच्या छळाला कंटाळून महिलेची दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी

0
324

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) : मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात घटना घडली. काजल सलते आणि प्रियांशू सलते अशी मृतांची नाव आहेत. भुदरगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ
मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगावा काजल यांच्याकडे लावला होता. मात्र सासरच्या लोकांची ही मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच काजल यांनी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत दोन वर्षाच्या प्रियांशुला घेऊन उडी टाकली. याप्रकरणी पती अवधूत सलते याच्यासह चौघांना अटक केली आहे.