सावित्रीच्या लेकीचे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त पुरस्कार देऊन सन्मान

0
233

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ उद्योगनगरच्या वतीने शिक्षण, सामाजिक, क्रीडा, पर्यावरण क्षेत्रातील 8 महिलांचा सन्मान करण्यात आला.

शितल परब (शिक्षण),कोमल शिरभाते(अभिनय), राधिका गायकवाड (कामगार कुटूबीय) सोमय्या शेख (कराटे ) संगीता जोगदंड (सामाजिक ),प्रज्वलिता जोशी (क्रिडा) सायली सुर्वे (पर्यावरण)सावनी राजपाठक( कौन्सलिंग) या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील महिला चा सन्मान केला.

महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासने व धाडसाने कार्यरत आहेत तसं पाहिलं तर खुरपणीपासून ते नासापर्यंत ,देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला कार्यरत आहेत. आज आपल्या देशाचा विचार केला 145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जगभर करत आहेत हे विसरून चालणार नाही. असे गौरव उदगार प्रबोधनकार कार्यमाचे अध्यक्षा शारदाताई मुंडे यांनी केले .

प्रमुख पाहुण्यां स्वप्नाली गरुडे या एच.आर मॅनेजर प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेडच्या त्या म्हणाल्या की प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत तर महिलांच्या खंबीरपणे पाठीशी पुरुष उभे राहिले आपणास पाहावयास मिळतात याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे.

प्रमुख पाहुणे गुणवंत कामगार आण्णा जोगदंड म्हणाले की महिला म्हटलं कि प्रेम, वात्सल्य ,स्नेह, ममता या भावना समोर येतात. स्त्री ही ती आई असते, ती ताई असते, ती मुलगी, असते ती बहीण असते ती सासू असते,ती आजी असते, विविध वेगवेगवेगळ्या भुमिका बजावत असते पण त्याआधी ती एक असते नारी. तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी ,त्या विश्व शक्तीचे नाव नारी . म्हणूनच त्यांचा समाजाला दिशा, स्फुर्ती देणाऱ्या,महीलाचा सन्मान केल्याने आम्हाला ही आनंद झाल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे राजेश हजारे म्हणाले पुणे गटात सर्वात कार्यक्षम विविध योजना राबणारे उद्योगनगरचे केंद्र असून केंद्र संचालक केंद्र प्रदिप बोरसे कामगाराच्या विविध योजना आस्थापणामध्ये जाऊन देत आसतात.
केंद्र संचालक प्रदिप बोरसे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती देऊन सर्वीनी योजना आपल्या आपल्या आस्थापनेतील कामगारांना सांगा वेळप्रसंगी मला बोलवा मी येईल असे सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना शितल परब म्हणाल्या की भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, शिक्षण तज्ञ, कवयित्री आणि अस्पर्श मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी जे ऐतिहासिक महान कार्ये केले आणि उदात्त मानतवादी विचारांच्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्हा सावित्रीच्या लेकीचा सन्मान केला हे आमचे भाग्य समजा मा.केंद्र संचालक सुरेश पवार यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले

पणे.विभागाचे कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे स्वप्नाली गरुडे,प्रिमियम ट्रान्समिशन,लि. प्रमुख पाहुणे आण्णा जोगदंड, राजेश हजारे ,समाज प्रबोधनकार शारदाताई मुढे,केंद्र संचालक प्रदिप बोरसे,,सुरेश पवार,गुणवंत कामगार शंकर नाणेकर, संजय साळुंखे, विनोद सुर्वे, सोमनाथ पतंगे, डॉ. शिवाजीराव बुचडे लोक परीवार अध्यक्ष, शंकरराव भुईटे दुर्गादेवी ट्रस्ट अध्यक्ष ,राहुल जोशी, स्वानंद राजपाठक,सुहास चव्हाण, राजेश घाडगे ,संदीप रांगोळे , संदिप शिंदे , ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रदिप बोरसे यांनी केले तर आभार शिवराज शिंदे यांनी मानले.