सावरगावच्या दसरा मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून पाच हजार नागरिक जाणार : सदाशिव खाडे

0
341

पिंपरी,दि. २८(पीसीबी) – माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विजयादशमी निमित्त बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी संत भगवान बाबा यांचे जन्मगाव बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून पाच हजाराहून जास्त नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

थोर संत भगवान बाबा यांनी सुरू केलेली ही परंपरा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर सुरू ठेवली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधना नंतर लोकनेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पुढे ही परंपरा कायम ठेवली. मागील दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दसरा मेळावा झाला नाही. यावर्षीचा दसरा मेळावा सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र व शेजारील राज्यातून ऊसतोड मजूर, वंचित, उपेक्षित, कष्टकरी कामगार व बहुजन समाजातील लाखो नागरिक उपस्थित राहत असतात. यावेळी भगवानबाबा यांचे दर्शन आणि पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी पिंपरी चिंचवड मधून माजी उपमहापौर केशव घोळवे, प्रा. गणेश ढाकणे, रघुनंदन घुले, कैलास सानप, दिपक नागरगोजे, हनुमंत घुगे, बाळासाहेब खाडे, गणपत खाडे, प्रा.एस. आर. खाडे, तानाजी ओंबासे, अरुण खरमाटे, अशोक ओंबासे, मयूर घुगे, मानसिंग माळवे, ज्ञानदेव खाडे, भागवत खेडकर, भागवत मुंडे, सुभाष दराडे, भास्कर खाडे यांच्यासह पिंपरी चिंचवड व पश्चिम महाराष्ट्रातून पाच हजाराहून जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सदाशिव खाडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.