सावधान !!! Samsung फोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची

0
553

तुम्ही सॅमसंग (Samsung) यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतातील सॅमसंग गॅलेक्सी (Samsung Galaxy) स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सरकारने एक अलर्ट जारी केला आहे. सरकारने सॅमसंग वापरकर्त्यांना त्यांचे स्मार्टफोन त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया म्हणजेच CERT-In ने सॅमसंग वापरकर्त्यांना सुरक्षा धोक्यांचा हवाला देत त्यांचे स्मार्टफोन अपडेट करण्यास सांगितले आहे.
हा अलर्ट सॅमसंग स्मार्टफोनच्या अशा वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांचे फोन सध्या Android 11, 12, 13 किंवा 14 व्हर्जनवर चालत आहेत. एजन्सीचे म्हणणे आहे की, अँड्रॉइड 11, 12, 13, 14 वर चालणाऱ्या सॅमसंग फोनमध्ये काही समस्या आहेत, ज्यामुळे हल्लेखोर तुमच्या नकळत तुमच्या फोनमध्ये घुसू शकतात.

CERT-In ने जारी केलेला अलर्ट उच्च-जोखीम चेतावणी श्रेणीचा आहे. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही अँड्रॉइड व्हर्जन 11 ते 14 वर सॅमसंग स्मार्टफोन चालवत असाल तर तुम्ही या अलर्टकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा सर्व वापरकर्त्यांनी सरकारच्या इशाऱ्यावर त्वरित कारवाई करून त्यांचे स्मार्टफोन अपडेट करावेत. अन्यथा, तुमच्या स्मार्टफोनमधून संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते.

चेतावणीनुसार, संबंधित अँड्रॉइड व्हर्जनवर चालत असलेल्या स्मार्टफोनमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे, आक्रमणकर्ते फोनमधील संवेदनशील माहिती बाहेर काढू शकतात. तसेच आक्रमणकर्ते लक्ष्यित प्रणालीवर अनियंत्रित कोड कार्यान्वित करू शकतात, ज्यामुळे नॉक्स फीचरचे ऍक्सेस कंट्रोल, फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर, एआर इमोजी अॅपमध्ये ऑथोरायझेशन इश्यू, मेमरी करप्शन यासह अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

CERT-In नुसार, आक्रमणकर्त्याने एखाद्या उपकरणाला लक्ष्य केल्यास, तो सिम पिन ऍक्सेस करू शकतो, ब्रॉडकास्ट पाठवू शकतो, एआर इमोजीचा सँडबॉक्स डेटा वाचू शकतो, सिस्टम टाइम बदलू शकतो, फायली ऍक्सेस करू शकतो. या असुरक्षिततेमुळे प्रभावित झालेल्या स्मार्टफोनमध्ये, Galaxy S23 Series, Galaxy Z Flip5, Galaxy Z Fold5 इत्यादी प्रमुख आहेत.