सावधान !!! महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी

0
278

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी) : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. सध्या महाराष्ट्रात 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहे. तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृत्यू झालेला तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने मृत्यू झालेला तरुण मागील आठवड्यात कोकणात फिरायला गेला होता. कोकणातून फिरून आल्यावर तो आजारी पडला होता. त्याला सर्दी, ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आली होती.

त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी सोबतकह H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसची चाचणी करण्यात आली त्यातही तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले.