सावधान !!! देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

0
316

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) चे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत.

सध्या देशात कोविडचे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळं 7 मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळं 2, उत्तराखंडमध्ये 1, महाराष्ट्रात 1, जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 मृत्यूची नोंद झाली आहे.

आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.47 कोटी (4,47,29,284) वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी 0.05 टक्के आहेत. कोरोना आजारातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या 44177204 आहे. तर, कोविड रुग्णांचा मृत्यू दर 1.19 नोंदवला गेला आहे.