सावधान ! आखाड साजरा करताय, हॉटेलात मटन म्हणून चक्क कुत्र्याचे मांस

0
81

बंगळुरु, दि. २७ : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये असलेल्या काही हॉटेलांमध्ये कुत्र्यांचं मांस विकलं जात असल्याच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर तपास सुरु झाला. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफएसएसएआयनं शुक्रवारी बंगळुरु रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या एका संशयास्पद शिपमेंटचा तपास सुरु केला आहे. शिपमेंटमध्ये असलेल्या मांसाचे नमुने घेण्यात आलेले आहेत. ट्रेनमध्ये सापडलेलं मांस बकऱ्याचं नसल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर तपासाला वेग आला. जप्त करण्यात आलेल्या मांसाचं वजन ५ हजार किलो आहे.

ट्रेनमध्ये संशयास्पद मांस येत असल्याची माहिती एफएसएसआयएआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या मांसच्या तपासणीसाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले. हे मांस कुत्र्याचं असल्याचा संशय स्थानिक माध्यमांनी वर्तवला आहे. मात्र यावर अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे मांस नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे, याचा तपास करण्यासाठी एफएसएसआयएआयनं मांसाचे नमुने घेतले आहेत.

ट्रेनमधून संशयित मांस येणार असल्याची तक्रार एफएसएसआयएआय मिळाली होती. मांसाची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्याचे नमुने घेतलेले आहेत. तपासणीनंतर ते मांस कोणत्या जनावराचं आहे ते कळू शकेल. आम्ही या प्रकरणात तपासाचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती बीबीएमपीचे आरोग्य आणि पशुपालनचे विशेष आयुक्त विकास किशोर यांनी दिली. स्थानिक हॉटेलांमध्ये दिल्या जाणाऱ्या मांसाच्या दर्जाबद्दल बंगळुरु महानगरपालिकेला तक्रार मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

तक्रार आधी देण्यात आलेली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. मात्र त्या प्रकरणातला अहवाल अद्याप आलेला नाही, असं पालिकेचे विशेष आयुक्त (आरोग्य आणि पशुपालन विभाग) विकास किशोर यांनी सांगितलं. याबद्दल रेल्वेतील सुत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगळुरु रेल्वे स्थानकात जवळपास १५० डब्यांमधून तीन टन मांस जयपूरहून आलं होतं. हे मांस कुत्र्याचं असल्याचं दावा एका गोरक्षकानं केला होता. पुनीत केरेहल्ली असं या गोरक्षकाचं नाव असून तो हत्या प्रकरणात तुरुंगात गेलेला आहे.