सार्वजनिक शौचालय देखभालीचा नवी दिशा हा महिला बचत गटाचा उपक्रम कौतुकास्पद..

0
524

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – लोक सहभागातून परिसर व शहर स्वच्छता राखल्यास पिंपरी चिंचवड स्वच्छ व सुंदर शहर म्हणून अग्रेसर होईल. त्यामध्ये महिलांचा सहभाग हा महत्व पूर्ण असल्याचे व झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालय देखभालीचा नवी दिशा हा महिला बचत गटाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत पिंपरी चिंचवड महापालिके चे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केले.

आयुक्त राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना खाली नवी दिशा उपक्रम राबवण्यात येत असून क प्रभागातील गवळी माथा झोपडपट्टीतील शौचालय जिजाऊ महिला बचत गट यांना देखभाल करण्यासाठी आज सुपूर्त करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालय भोसरी येथे
‘क’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गवळी माथा येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व देखभालचे कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांच्या हस्ते जिजाऊ महिला बचत गटा कडे सोपवण्यात आले असून सदर कार्यक्रमात उप आयुक्त रविकिरण घोडके , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्यअधिकारी बी. बी. कांबळे, कार्यकारी अभियंता रामुगुडे , उपअभियंता सुनील हरिदास मुख्यआरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, मनपा कर्मचारी आणि जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर , गवलीनगर पतसंस्थेचे रामदास आदक आदी उपस्थित होते.