सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

0
220

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – हॉटेलमध्ये जेवण करताना झालेल्या वादातून चौघांनी एकमेकांशी झोंबाझोंबी केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १८) रात्री साई चौक, पिंपरी येथे घडली.

विशाल उर्फ डॉनी भगवानदास बहादूर (वय ३५, रा. मिलिंदनगर, पिंपरी), अनिकेत उर्फ निकेत भगवानदास बहादूर (वय ३२), दीपक महिपाल तुसाम (वय २७, रा. मॉडेल कॉलनी, पुणे), रवी लोट (वय ३०, रा. देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप शेळके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जेवण करण्यासाठी गेले असता तिथे त्यांचे एकमेकांशी वाद झाले. त्यांनी आपसात झोंबाझोंबी करून शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.