सांगवी, दि. २9 (पीसीबी)
सार्वजनिक नळावर घाण करू नका म्हटल्याने तीन महिलांनी एका महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता पिंपळे गुरव येथील प्रभात नगर येथे घडली.
याप्रकरणी महिलेने तीन महिलांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी महिलेला सार्वजनिक नळावर घाण करू नका. तसेच केलेली घाण उचला, असे सांगितले. त्या कारणावरून आरोपी महिलेने तिच्या सासू आणि नणंदेला बोलावून घेतले. तीन महिलांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हातापायाने मारहाण केली. सिमेंटच्या विटेने डोक्यात मारून महिलेला जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.