सार्वजनिक ठिकाणी राडाराडा टाकल्याबद्दल तरुणावर गुन्हा

0
470

दापोडी , दि. २१(पीसीबी) :सार्वजनिक ठिकाणी ट्रॅक्टर मधून आणलेला राडाराडा टाकल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दापोडी येथे करण्यात आली.

विजय रामू चव्हाण (वय 24, रा. बालाजी चौक पाषाण पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय चव्हाण याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर मधून पालापाचोळा आणि राडाराडा आणला. तो राडाराडा दापोडी येथील मुस्लिम दफनभूमी समोर असलेल्या नाल्यामध्ये टाकला. याबाबत कारवाई करण्यात आली असून विजय चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.