सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन केल्याप्रकरणी एकास अटक

0
500

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यातील एकाला पोलिसांची अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 14) दुपारी सव्वादोन वाजता स्पाईन रोडवर घडली.

लियाकत हुसेन जाकीर खान (वय 36, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. राजस्थान), तुकाराम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लियाकत याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दादा धस यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लियाकत याने तुकाराम याच्याकडून गांजा विकत आणला. तो त्याने स्पाईन रोडवरील मटेरियल गेटजवळ असलेल्या ओव्हर ब्रिजच्या खाली बसून सेवा केला. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून लियाकत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार ग्राम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.