सायबर फसवणुकी बाबतीत अधिक जनजागृती होणे गरजेचे- आयुक्त गोहील

0
17

आयसीएआय मध्ये दोन दिवसीय परिसंवाद

पिंपरी,दि . ५ ( पीसीबी ) – केवायसीच्या नावाखाली आपल्या न कळत आपली फसवणूक होत असते. हे आपल्याला माहिती होत नसते.बदलत्या तंत्रज्ञानामुळे आज सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे.प्रगत तंत्रज्ञानाने प्रगत फसवणूकीचे प्रकार आणि पद्धतीत वाढ झालेली आहे.हे आपल्या पुढील एक आव्हानच आहे. अशा वेळी फॉरेन्सिक विभागाची महत्वाची भूमिका बाजवत असते.यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे हाच पर्याय आहे.सायबर फस्वणुकी बाबतीत बाबतीत समाजात जनजागृती अधिक होणे गरजेचे आहे. असे उदगार जीएसटी फॉरेन्सिक इंटिलिजन्स महासंचनालयाच्या आयुक्त वृंदबा गोहील यांनी काढले.
निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चॅर्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने “अनंत उडान” कार्यक्रमांतर्गत फॉरेन्सिक अकौंटिंग अँड फ्रॉड डिटेक्शन विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आलेल्या परिसंवादाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी विभागीय कौन्सिल सदस्य सीए रेखा धामणकर,चेतन दलाल,सीए महेश भटकी, सौरभ लाहोटी, योगेश ठाणगे, गोविंद आगरवाल यांनी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. दोन दिवसीय परिसंवादात सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंट करताना घ्यायची काळजी, फायलिंग करताना आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर कसा करावा? यावर आहेपोह झाला.
यावेळी आयसीएआय पुणे शाखेच्या विकासा अध्यक्ष प्रज्ञा बंब, खजिनदार नेहा फडके, रवी बजाज, ऋषीं लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक पिं -चिं शाखेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, उपाध्यक्ष सारिका चोरडिया, सचिव मनोज मालपाणी,खजिनदार महावीर कोठारी, विकासा अध्यक्ष धीरज बलदोटा कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे,शैलेश बोरे, शाखा नॉमिनी राजेश अग्रवाल आदी मान्यवर सनदी लेखापाल उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषण अध्यक्ष सीए वैभव मोदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मालपाणी यांनी तर आभार शैलेश बोरे यांनी मानले.