पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक प्रविण तुपे यांनी दिली आहे.
“दहावी व बारावी नंतर शिक्षणाच्या नवीन वाटा“ या विषयावर सदरचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. श्रीमंती स्मिता विखणकर या व्याख्यात्या म्हणून विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत तरी या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी ह्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुपे यांनी केले आहे.
व्याख्यान संपल्यानंतर संगीत संध्या कार्यक्रमा अंतर्गत “कथ्थक नृत्याविष्कार” सादर करण्यात येणार आहे. सदरचे कार्यक्रम सायन्स पार्कचे सभागृहामध्ये सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले आहेत.