सायंकाळी लहान मुलीसह महिला दुचाकीवरून जात होती, तेवढयात चोरटयांनी……

0
10

रावेत, दि. 15 (पीसीबी): लहान मुलीसह दुचाकीवरून चाललेल्‍या महिलेच्‍या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सान्‍याचे गंठण दुचाकीवरून आलेल्‍या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. १२) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास रावेतमधील ब्राइट स्‍टार प्रायमरी स्‍कूलच्‍या समोर घडली.

याबाबत रावेत येथे राहणार्‍या ४३ वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्‍या लहान मुलीसह दुचाकीवरून चालल्‍या होत्‍या. त्‍या सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास ब्राइट प्रायमरी स्‍कूलच्‍या समोर आल्‍या असता समोरून दुचाकीवरून आलेल्‍या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्‍या गळ्यातील सोन्‍याचे गंठण हिसकावून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र फिर्यादी यांनी गंठण पकडून ठेवले असता ते तुटून चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्‍याचे गंठण हिसका मारून चोरून नेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.