सामाजिक भान जपत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादांचा वाढदिवस साजरा

0
481

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – ‘माणसाने कितीही उंची गाठली तरी त्याचे पाय जमिनीवर असायला हवेत! समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन जमेल तितके त्यांच्या आयुष्यात आनंद पेरत राहावे,’ या अजित पवारांच्या म्हणण्यानुसार किंबहुना आदेशानुसार शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंदाचे झाड पेरले ! कुठे वृक्षारोपण, कुठे लहान मुलांना खाऊ वाटप, कुठे अन्नदान तर कुठे रक्तदान शिबिर आयोजित करून साधेपणाने सामाजिक भान जपत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या नेत्याचे वाढदिन सार्थक केले!राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पुढाकार घेतला होता. वाढदिवसाचे औचित्य शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक कार्यक्रम पार पडले. यानिमित्त समाजातील गरीब, गरजू नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पर्यावरण रक्षण, रक्तदान यासारखे उपक्रम राबविण्यात आले.

अनाथ आश्रमात अन्नदान
अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 13 सोनवणे वस्ती चिखली येथे विकास अनाथ आश्रम येथील लहान मुलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख, युवानेते मनोजभाऊ जरे उपाध्यक्ष लवकुश यादव, सरचिटणीस दीपक गुप्ता, सचिव कुणाल कडू यांच्यासह राहुल सिंग, विजय जरे, दत्ता जरे, मनोज होरे, दीपक कांबळे, संजय शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोसरी विधानसभा सरचिटणीस रोहित खोत यांनी केले होते.

आरोग्य तपासणी शिबीर
नागेश्वर विद्यालय, भागशाळा, चिखली येथे अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन तृप्ती मोरे, सोमनाथ मोरे यांनी केले होते. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह चिखली परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन
राष्ट्रवादी शिक्षक सेल वतीने वाघेश्वर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेलचे निर्मिती करण्यात आली असून सेलचे उद्‌घाटन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप तापकीर, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवकर घनश्याम खेडकर, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप यांच्यासह पंडीत तापकीर, किसन गाडेकर, ज्योती तापकीर, विपुल तापकीर, पूनम वाघ, अनिल तापकीर, गणेश ताजने, गुलाब ताजने, विजया कांबळे, दत्ता बुरडे, सुनील पठारे, तानाजी तापकीर, ॲड. संतोष तापकीर, रामभाऊ सासवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. डॉ. संदीप तापकीर यांचा संकल्पनेतून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.यावेळी अंकिता काळजे हिचा ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अजित गव्हाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य शशीकांत पेठे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हिरामण सस्ते, शारदा सस्ते यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर सारीका तापकीर यांनी सूत्रसंचालन केले शेवटी मोहन कांबळे यांनी आभार मानले.
मुख्य कार्यक्रमानंतर वाघेश्वर विद्यालयाच्या वतीने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. यानंतर शाळेमध्ये वृक्षारोपन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

अपंग मुलांना फळांचे वाटप
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका सविताताई वायकर यांच्या वतीने यमुनानगर येथील ४५ अपंग मुलांना फळे व सुका मेव्याचे वाटप करण्यात आले. गेली २६ वर्षे वायकर यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजाराम आयवळे, अशोक वायकर, रमेश निकाळजे, अनिल वायकर, राहूल कांबळे, प्रथमेश वायकर, शुभम गादीया यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ
प्रभाग क्र. १२ घरकुल येथे अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांची सोय व्हावी या उद्देशाने या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच यावेळी सोसायटीमध्ये दोन सौर उर्जा पॅनलही मोफत बसवून देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश जाधव यांनी केले होते.

नेत्रतपासणी, रक्तदान शिबिर
माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषाताई वाघेरे व युवा नेते ऋषिकेश वाघेरे यांच्या वतीने पिंपरी-वाघेरे येथे अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभाग नोंदवित परिसरातील तरुणांनी उत्साहात रक्तदान केले.

शालेय साहित्य वाटप, विविध स्पर्धा
अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगवी परिसरातील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.