सामाजिक बांधिलकी जपत गरीब ११०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0
360

पिंपरी, दि.१७ (पीसीबी )- सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांच्यावतीने गरीब व होतकरू अकराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त
त्यांची शालेय साहित्यतुला करून प्रशांत शितोळे,नाना काटे,विनोद नढ़े शाम लांडे,राहुल भोसले, विनायक रणसुंबे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांच्याकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार फूलस्केप वह्या,चित्रकला वही, पेन,पेन्सिल,कम्पास बॉक्स,रबर, स्केचपेन बॉक्स,स्केल असे किट देण्यात आले.

नवीन शालेय वर्षाची सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे शालेय साहित्य खरेदीची लगबग चालू असते. अशा वेळी समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे समाजाच्या सर्वस्तरातून कौतुक होत आहे.