सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आप्पा डेरे यांचे निधन

0
119

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ उद्योजक आत्माराम तबाजी डेरे उर्फ आप्पा (वय-६५) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा दीपक, दोन मुली, सून असा परिवार आहे.
शहरातील सर्वात मोठे वाहतूक व्यावसायिक तसेच आकुर्डी येथील धनश्री हॉटेलचे संचालक होते. निगडी प्राधिकऱण येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची उभारणी त्यांनी केली. दरवर्षी स्वामी समर्थ जयंती सोहळा त्यांच्या प्रेरणेतून होत असतो. आंबेगाव तालुक्यातील आमोंडी-गंगापूर हे त्यांचे मूळ गाव असून तेथील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निगडी प्राधिकरणातून महापालिका लढवली होती. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत निष्ठावंत सहकरी म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत होते.
आज सायंकाळी निगडी येथील स्मशानात त्यांच्या पर्थिवावार अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.