सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीनेच केला खून

0
716

चिंचवडगाव, दि. २४ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक चळवळीत कायम अग्रेसर असलेल्या युवा सामाजिक कार्यकर्ता नकुल आनंदा भोईर (वय- ४०) याचा मध्यरात्री खून झाला. त्याची पत्नी चैताली(वय-२९) हिनेच पोलिसांना फोन करून आपण खून केल्याचा सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतेले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे माणिक कॉलनी, चिंचवडगाव परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
मध्यरात्री नकुल भोईर आणि त्याच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. भोईर हे पत्नीच्या चारित्रावर कायम संशय घेत होते. मध्यरात्री तिने कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. पती पत्नी दोघेही महापालिका निवडणुकिसाठी इच्छुक होते. दोनच दिवसांपूर्वी चिंचवड मोरया गोसावी मंदिराशेजारी पाडवा निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. मोठ मोठे पोस्टर आणि होर्डींगमधून चैताली भोईर यांचा प्रचारही सुरू केला होता.
नदी सुधार प्रकल्प विरोधातील चळवळीत या सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार होता. लिंकरोड परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सतत पुढाकार असे.