साबळेवाडी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

0
47

चाकण, दि. 4 (पीसीबी)

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साबळेवाडी येथे दारूभट्टीवर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

किरण सुरेश राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे डोंगराच्या कडेला असलेल्या ओढ्यालगत एका व्यक्तीने दारूभट्टी लावली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये एक लाख 75 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.