सापडलेल्या वायफाय एटीएमद्वारे पैसे ट्रान्सफर करत फसवणूक

0
271

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – सापडलेले वायफाय एटीएम स्वाईप करून परस्पर पैसे काढून घेण्याचा प्रकार बुधवारी (दि. १८) सायंकाळी म्हाळुंगे येथे घडला.

प्रेमकुमार गुलाब वाघमारे (वय ४१, रा. म्हाळुंगे, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश रघुनाथ बोडके (वय ३२, रा. ओझरकरवाडी, रिहे, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश याला फिर्यादी यांचे एटीएम वायफाय डेबिट कार्ड सापडले. त्याचा गैरवापर करून शैलेश याने एटीएम विविध ठिकाणी स्वाईप करून पैसे काढून घेतले. फिर्यादी यांनी शैलेश याला थांबविले असता त्याने अरेरावीची भाषा करून दुचाकीवरून पळ काढला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.