साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आकुर्डी भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी

0
400

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – मच्छर चावल्याने डेंगू, मलेरियेचे आजार होतात. पावसाळ्यात मच्छरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी केली आहे.

याबाबत अ क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य अधिका-यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,  शहरामध्ये मागील दहा ते पंधरा दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नाले सफाईचा फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी साचले आहे. ड्रेनेज लाईनचे घाण पाणी चोकअप होऊन ते बाहेर उघड्यावर येत आहे. गटार मधून घान कचर रस्त्यावर येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर व डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी व प्रभाग क्रमांक 15 प्राधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छर व डासांचा उपद्रव होत आहे.

 ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदी साथींचे आजार तसेच डेंगूच्या आजारी रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या पुढच्या काळात डेंगू,मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव परिसरात अधिक वेगाने होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी व धुर फवारणी करावी अशी मागणी केली आहे.