सात वर्षीय बालिकेवर अत्‍याचार प्रकरणी अल्‍पवयीन मुलावर गुन्‍हा

0
123

भोसरी, दि. 25 (पीसीबी) : एका सात वर्षीय बालिकेवर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी १७ वर्षीय मुलावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना आदर्शनगर, मोशी येथे बुधवारी (दि. २३) सायंकाळी सव्‍वापाच वाजताच्‍या सुमारास घडली.

याबाबत पिडित मुलीच्‍या २४ वर्षीय आईने याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गव्‍हाणे वस्‍ती, भोसरी येथील १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांच्‍या घराजवळ राहणार्‍या मित्राच्‍या झारी आरोपी येत असे. बुधवारी सायंकाळी सव्‍वा पाच वाजताच्‍या सुमारास आरोपी याने अल्‍पवयीन मुलीस मित्राच्‍या घरात नेले. तिथे तिच्‍यावर अत्‍याचार केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.