सात वर्षीयचिमुकलीवर वृद्धाने केला लैंगिक अत्याचार

0
452

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर 60 वर्षीय वृद्धाने लैंगीक अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी दापोडी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

करीम कादर खान (वय 60, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 24 वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सात वर्षीय मुलीला आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवले. तिला तो स्वतःच्या घरात घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितले असता आईने पोलिसात धाव घेतली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.